WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Who sewed the pieces of Sambhaji Maharaj’s body?: संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे कोणी शिवले ? काय घडले मृत्यू नंतर ….

Who sewed the pieces of Sambhaji Maharaj’s body? : संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे कोणी शिवले ? काय घडले मृत्यू नंतर ….

११ मार्च १६८९ चा तो काळा दिवस. त्या औरंग्यानं वळवूद तुळापूर येथे संभाजी राजांना हाल हाल करून ठार मारले. आधी त्या औरंग्याने शंभूराजांचे डोळे काढले होते, जीभ छाटली, संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली. त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला. त्यानंतर त्यानं राजांचा एक एक अवयव वेगळा करून औरंग्याच्या आज्ञेवरनं त्यांचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला.(Who sewed the pieces of Sambhaji Maharaj’s body?)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आतापर्यंत राजाचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमादेखील आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होती. ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटत होतं. राजांचं ते शौर्यने भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत त्या रक्ताची अंगार इतकी होती की, त्यामूळ त्या भीमा इंद्रायणीच पाणी देखील थरारत होतं. आपल्या शंभूराजाचा देह विच्छिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता.(Who sewed the pieces of Sambhaji Maharaj’s body?)

इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यापाशी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती. औरंग्यानं तसा आदेशच काढला होता. त्यानं फर्मान सोडलं होतं की, कोणी जर का शंभुराजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील, जे राजांचे झाले. औरंग्यांना दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वड्यांवरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथरत होती. रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते. आपल्या शूर वीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रडू पाहत होती.(Who sewed the pieces of Sambhaji Maharaj’s body?)

MAHAJYOTI MBA CAT CMAT CET YOJNA 2025 : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर त्वरित अर्ज करा!

अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान केलं, त्याच्यासाठी पुढे व्हा, असं जणू आव्हान करत होती, पण लोक मात्र भीतीनेआपापल्या घरात लपून बसले होते. पाहता पाहता सकाळ झाली. रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली. त्या गावात राहणारी जनाबाई ही परटणीचं काम करत होती. ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे. नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलाच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली. जेव्हा ती धुणं धुवायला बसली, तेव्हा तिला ते रक्तांना माखलेले तुकडे काठी पडलेले दिसले.(Who sewed the pieces of Sambhaji Maharaj’s body?)

तिला प्रथमता कळलच नाही की, ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजाचे आहेत. तिला असे वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत कारण तिथं तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं. कपडे धूत असताना एक आतडं तिच्या हाती आलं. तेव्हा तिनं ओरडून म्हटलं की,”माणसानं साऱ्या लाजा सोडल्या. आता अशी आताड देखील पाण्यामध्ये सोडायला लागले. ” तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की,’ हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजे संभाजी राजाचे आहेत.  काल औरंग्यानं राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले. तू तिथे जाऊ नकोस, नाहीतर औरंग्याची लोक येतील आणि तुला पकडून नेतील. त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारी लोकं आज घरात दडून बसलीआहेत, तू देखील घरी निघून जा.” आपल्या संभाजीराजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून खडाखडा पाणी वाहू लागले.

तशीच उठली आणि गावाकडे पळाली. ती दामाजी पाटलाच्या वाड्यात आली. आता सर्वत्र शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती. बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले. आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते. प्रत्येक जण अश्रू गाळत होता. तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की,” आपल्या शिवाजी महाराजांच्या लेकाच रक्त, हाडमास आपल्या गावात आलेल आहे, ते असंच नदीकिनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहोत. या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे. ” गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला. तुमचं बोलणं खर आहे, आपल्या शिवाजी राजांनी आपल्यावरती, आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मूलखावरती केलेले उपकार कमी आहेत का? आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा गाव शिवाराच्या बाहेर पडावा, आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसावं.(Who sewed the pieces of Sambhaji Maharaj’s body?)

हे शोभून नाही दिसत. ” तेव्हा तेथे असलेले दामाजी पाटील म्हणाले, ” तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे. जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे, त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे. पण करणार काय गावाच्या सभोवताली चार-पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे. त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे. शंभूराजाच्या रक्त मासाला कोणी शिवू असं त्याने फर्मान काढलेला आहे. ” तेव्हा एकानं म्हटलं,” खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेली आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा ?” हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले. भाकर खाऊन सगळेजण पडले होते. झोप तर तशी कुणालाही येत नव्हती. सगळेजण विचाराच्या गुंत्यामध्ये होते. पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती. आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं होतं. ती सरळ पाटलीनीच्या वाड्यावर गेली. तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना देखील गोळा केलं.(Who sewed the pieces of Sambhaji Maharaj’s body?)

शिवाजी राजे आणि संभाजीराजां विषयी गोष्टी काढून ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले. राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीज हेलावून गेले होते. असे बोलता बोलता रात्र बरीच झाली, पण कुणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं. आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. तेव्हा त्या पाटलीनी ने मंदिरातील गोरखनाथ बुवांना बोलावून घेतलं. हे सार पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला. आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला.

थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागले की “जर आम्ही संभाजी महाराजांचं मास गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून करून आम्हाला करणार काय ? गाव जाळेल इतकच ना? ” आता तिच्या बोलल्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली. तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की,” आपल्या रितीरिवाचा प्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदीकिनारी एखादं बेवारस मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे.(Who sewed the pieces of Sambhaji Maharaj’s body?)

असं शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. “तेव्हा लांबूनच त्या गोविंदने आवाज दिला आणि सांगितलं की,” इथे तर आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत, आम्ही मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालुन गप बसलो आहोत. ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत.” हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू माय भवानी सळसळली.” चला नदीकाठी आपल्या राजाचं तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्नी संस्कार देऊ.” सर्वत्र एकच आवाज उठला. सर्वत्र काळाभोर काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेकींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता.

साऱ्याजणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या. तो होणारा गलका दामाजी पाटलाच्या कानावर देखील गेला. आत मध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले. तो आपल्या पत्नीस म्हणाला,” कारभारीन बाई हे काय चालवला आहे, बादशहाच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला?” तेव्हा पाटलीन म्हणाली,” माझ्या शिवाजी राजाच्या लेकराचं मास घारी गीधड्यांना देण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट ? असा गाव आणि असा झुलूम हवा कशाला? सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर, निघतो आम्ही.” पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली. तिच्याबरोबरच जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्रीशक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली.(Who sewed the pieces of Sambhaji Maharaj’s body?)

त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली. हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता. सर्वजण नदीकाठी पोहोचले. सर्वत्र अंधार होता. शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशहाच्या फौजेची भीती देखील होती. बायांनी पाठीमागं पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती. त्या पुरुष मंडळींमध्ये दामाजी पाटील देखील होते. आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाढ झोपी गेले होते. सर्व गावकरी दबकत दबकत त्या नदी च्या किनारी आले. तिथे त्यांनी कुडाचा चुल्हा पेटवला.(Who sewed the pieces of Sambhaji Maharaj’s body?)

मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले. राजांचे कान, बोटे, हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले. गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजाचे येथील मांसचे तुकडे, शरीराचे अवयव गोळा केले. त्या अंधारातच ते मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले. काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकोट आणलं, कुणी लाकूड फाटा आणला, दहनाची सर्व तयारी झाली. पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला. “राजाची चीता रचायची कोणाच्या जागेत ? ” दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनी वरती पाणी सोडायला तयार होते, पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती.

त्या जागेतून बादशहाचा तळ देखील अगदी जवळच होता.बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते. सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबूजच होता. लोकांची ही कुजबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला, गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडं त्याने बोट केलं आणि म्हणाला,” ही आम्हा महारांची वतनी जमीन आहे, इथे आमच्या जमिनीत अग्नी द्या शंभूराजांना. समजा, पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ. आम्हा गरिबांच्या ताटात भूगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभू राजा, हे आम्ही विसरू शकत नाही.

” मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं. बादशाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताठया पोरांना तिथं उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं. अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले, तर त्यांना वेशीच्या बाहेरच आडवा, गोफणील्या दगडाने. प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नये. असं फर्मान दिलं. गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले. शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला. आग आग धडधडा पेटू लागली, त्या ज्वाला त्या काळाकुट्ट आसमानाला भेटू लागल्या. सगळे गावकरी ढसाढसा रडत होते.

स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या. लोकं गुरासारखे हंबरडा फोडत होते. ” अर, रायगडाच्या राजेश्वरा, कुठून कुठ आलास रे पाखरा, अरे शंभूराजा ” सर्वाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. तांबड फुटायच्या आधीच चिता बुजवली गेली. शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले. शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली. ते गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावस भाऊ. त्या जनाबाईचे, राधाई पाटलीनीचे, त्या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. तो मारणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले. जय भवानी. जय शिवराय, जय शंभुराजे

 

Leave a Comment