BEST SUMMER HYDRATION DRINK
उन्हाळ्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे डिहायड्रेशन शरीरात पाणी कमी झालं की लगेच थकवा येतो.(BEST SUMMER HYDRATION DRINK) त्वचा कोरडी पडते आणि डोकं दुखायला लागतं. तर आज आपण डिहायड्रेशन टाळण्यासाठी तुम्ही घरच्या घरीच काही सोपे आणि हेल्दी ड्रिंक्स तयार कसे करू शकता हे नैसर्गिक ड्रिंक्स तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात आणि आवश्यक इलेक्ट्रोलाईट्सही पुरवतात हे आज आपण या लेखा मध्ये बघणार आहोत.(BEST SUMMER HYDRATION DRINK)
BEST SUMMER HYDRATION DRINK
1) Lime water (लिंबु पाणी)
लिंबू पाणी हायड्रेशनच सोपं आणि बेस्ट सोल्युशन. कधी कधी आपण तहान लागली की थेट कोल्ड ड्रिंक्स सोडा किंवा पॅकेज ज्यूस घेतो पण हे ड्रिंक्स शरीराला हायड्रेट करण्याऐवजी अजूनच डिहायड्रेशन वाढवतात. त्यापेक्षा लिंबू पाणी हा बेस्ट उपाय आहे. लिंबू पाणी केवळ पाणी कमी होण्यापासूनच वाचवत नाही तर शरीराला डिटॉक्स करून फ्रेश सुद्धा ठेवतं. लिंबातील विटामिन सी Vitamin C त्वचेसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप फायदेशीर ठरतं.
SUMMER HEALTH TIPS : उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी हे करा ? जाणुन घ्या!
2) Bel Juice (बेल सरबत)
बेल सरबत ज्याला उन्हाळ्यातलं नॅचरल थंडगार टॉनिक मानलं जातं. आपल्या आजी-आजोबांच्या काळापासून पासूनच बेल सरबत हा गर्मीचा प्रभाव कमी करणारा एक आयुर्वेदिक उपाय म्हणून प्रसिद्ध आहे. बेल सरबत नैसर्गिक थंडावा देऊन शरीराला हायड्रेट ठेवतं आणि उष्णतेच्या दुष्परिणामांपासून बचाव करत. तर हे बेल सरबत बनवायचं कसं?
हे बेलफळ तुम्हाला मार्केटमध्ये Easily मिळेल तर बेलफळ फोडून गर चमच्याने काढा. घरात एक ग्लास पाणी घालून मॅश करा मिश्रण गाळून घ्या. आणि त्यात गूळ किंवा मध घालून चांगलं ढवळा शेवटी चिमूटभर जिरेपूड घाला. आणि तुमचं बेल सरबत तयार आहे. तर आजीच्या वटव्यातलं हे खास सरबत उन्हामुळे होणाऱ्या अशक्तपणावर रामबाण उपाय आहे.
3)Kakdi Padina Juice (काकडी पदिना ज्यूस)
नेक्स्ट म्हणजे काकडी पुदिनाचं फ्रेश ड्रिंक उन्हाळ्यात काकडी खाणं कायमच फायदेशीर असतं. अनेकदा आपण
काकडी नुसती कापून किंवा कधी काकडीची कोशिंबीर करून खातो या ऐवजी हे ड्रिंक तुम्ही ट्राय करून बघा यासाठी तुम्ही काकडीचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये टाका.त्यामध्ये आल्याचा छोटासा तुकडा लिंबाचा रस आणि पुदिन्याची पानं आणि थंड पाणी घालून ब्लेंड करा.
हे मिश्रण गाळून घ्या त्यात मध आणि चवीनुसार चिमूटभर मीठ आणि जिरेपूड टाका आणि तुमचं हायड्रेटिंग ड्रिंक रेडी आहे. काकडीमध्ये 95% पाणी असतं जे शरीरातलं हायड्रेशन टिकवून ठेवतं उन्हाळ्यातील थकवा आणि कमजोरी दूर करत. तर हे ड्रिंक सुद्धा तुम्ही उन्हाळ्यात ट्राय करू शकता.
4) Coconut water (नारळ पाणी)
नारळ पाणी नैसर्गिक इलेक्ट्रोलाईट्स ने समृद्ध असलेलं नारळ पाणी डिहायड्रेशन साठी सर्वोत्तम आणि ताजे तवाने पेय आहे. नारळाच्या पाण्यात पोटॅशियम सोडियम आणि मॅग्नेशियम सारखे महत्त्वाचे इलेक्ट्रोलाईट्स असतात हे शरीरातील द्रव संतुलन नियंत्रित करण्यास मदत करतात. ज्यामुळे ज्यांना खूप घाम येतो त्यांच्यासाठी नारळ पाणी हे बेस्ट सोल्युशन आहे. ज्यात कमी कॅलरीज आणि हायड्रेशन जास्त असतं ज्यामुळे उन्हाळ्यात ताजे दवानं राहण्यासाठी एक उत्तम पर्याय बनत.
5) Chiya Seeds Water (चीया सीड्स पाणी)
उन्हाळ्यातील एक सुपर फूड म्हणजे चिया सीड्स वॉटर वाढत्या उन्हाळ्यात चिया सीड्स वॉटर हे शरीरातील एक एक नैसर्गिक आणि आरोग्यदायी ड्रिंक ठरू शकतं चिया सिड्स मध्ये ओमेगा थ्री फायबर अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात जे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवतात आणि उष्णतेपासून संरक्षण करतात.
त्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा चिया सीड्स घाला चिया सीड्सना पाण्यात 10 ते पंधरा मिनिटं भिजू द्या मग ते चांगलं ढवळून घ्या हवं असल्यास त्यात लिंबाचा रस किंवा मध मिसळा आणि दररोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी दिवसातून दोन वेळा हे ड्रिंक्स घ्या.
Benifits of Best Summer Drinks
शरीरातील पाण्याची उणीव भरून काढणे (Hydration)
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमी होते. लिंबू पाणी, नारळ पाणी, काकडीचा रस, किंवा छाछ यासारख्या पेयांमध्ये पाण्याच्या बरोबर मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात, जे शरीराला पुनर्जीवित करतात.
शरीराची थंडावण (Cooling Effect)
केवडा, कोकम, आंब्याचा पना, आणि ताक यांसारख्या पदार्थांमध्ये थंड गुणधर्म असतात. ही पेये पोटातील उष्णता कमी करून थकवा आणि चक्कर यांसारख्या समस्यांवर उपाय करतात.
पोषक तत्वांचा स्रोत (Rich in Nutrients)
सोलकढी, कोकम शर्बत, आणि आंबा पन्ना यांसारख्या पेयांमध्ये प्रोबायोटिक्स, विटॅमिन सी, आणि अँटिऑक्सिडन्ट्स भरपूर प्रमाणात असतात. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.
ऊर्जा देणारे (Energy Booster)
उन्हाळ्यात श्रम जास्त होतो, त्यामुळे शरीराला ऊर्जेची गरज असते. गुळ-लिंबू शर्बत, सत्तू पाणी, किंवा ताज्या फळांचे रस यांसारख्या पेयांमधील नैसर्गिक साखर ऊर्जा पुरवठा करते.
पचनासाठी सहाय्य (Digestive Aid)
उन्हाळ्यात जड अन्न पचवणे अवघड जाते. छाछ, जिरे पाणी, किंवा पुदिन्याचा शर्बत यांसारख्या पेयांमध्ये पाचनसहायक गुणधर्म असतात, जे आतड्यांसाठी फायदेशीर ठरतात.
त्वचेसाठी लाभदायी (Skin Benefits)
नारळ पाणी आणि काकडीचा रस यांसारख्या पेयांमध्ये सिलिका आणि विटॅमिन्स असतात, जे त्वचेला ओलावा राखण्यास मदत करतात आणि उन्हाळ्यातील डॅमेज रोखतात.
हायड्रेट राहणं हे फक्त उन्हाळ्यासाठीच नाही तर रोजच्या दिवसासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी महागडे एनर्जी ड्रिंक्स न पिता घरच्या घरी सहज बनवता येणाऱ्या या हेल्दी ड्रिंक्सचा तुम्ही वापर करा. आणि अशाच हेल्थ रिलेटेड माहितीसाठी माझा अड्डाला नक्की फॉलो करा.