HDFC BANK PARIVARTAN’S ECSS SCHOLARSHIP
नमस्कार मित्रांनो एचडीएफसी बँक तर्फे विद्यार्थ्यांसाठी एक चांगली स्कॉलरशिप देण्यात येत आहे. त्या स्कॉलरशिप च नाव आहे एचडीएफसी बँक परिवर्तन स्कॉलरशिप (HDFC BANK PARIVARTAN’S ECSS SCHOLARSHIP) या स्कॉलरशिप अंतर्गत पहिली ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी अर्ज करू शकतात तसेच बारावीनंतरचे विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकणार व पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी सुद्धा या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र राहणार.
या स्कॉलरशिप चा फायदा असा आहे की विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये पर्यंत ही स्कॉलरशिप मिळते. व HDFC BANK PARIVARTAN’S ECSS SCHOLARSHIP ही स्कॉलरशिप दरवर्षी विद्यार्थ्यांना मिळत असते.
आता या एचडीएफसी बँक परिवर्तन स्कॉलरशिप (HDFC BANK PARIVARTAN’S ECSS SCHOLARSHIP )साठी कोण पात्र राहणार याचा काय आहे या स्कॉलरशिप साठी कोणती कागदपत्रे लागणार व या स्कॉलरशिप साठी अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
HDFC BANK PARIVARTAN’S ECSS SCHOLARSHIP वैशिष्ट्य काय आहे
एचडीएफसी बँक परिवर्तन स्कॉलरशिप हा एचडीएफसी बँक तर्फे राबवला जाणारा एक उपक्रम आहे या उपक्रमाचा उद्देश असा आहे की समाजातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी व समाजातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहायता देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येते.
ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे कमी आहे व जे विद्यार्थी आर्थिक समस्येमुळे शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाते व 75 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत केली जाते.
या शिष्यवृत्तीसाठी पहिली ते बारावी , बारावी ते (General & Professional) UG & PG,ITI, DIPLOMA असे विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकता येणार व या स्कॉलरशिपचा लाभ घेता येणार.
APAAR ID CARD : कसं काढायचं? जाणून घेऊया
1) 1st to 6th Class : 15000rs
2) 7th to 12th/ ITI/DIPLOMA/POLYTECHNIC STUDENTS : 18000rs
3) GENERAL UG ( Under Graduate) : 30000rs
4) Professional UG (Under Graduate) 50000rs
5) GENERAL PG (POST GRADUATION) : 35000rs
6) PROFESSIONAL PG ( POST GRADUATION) : 75000rs
Last Date to Apply: 31st December 2024
HDFC BANK PARIVARTAN’S ECSS SCHOLARSHIP पात्रता काय ?
- अर्ज करता हा भारताचा नागरिक असावा.
- अर्जदार हा खाजगी किंवा अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेत असावा व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असावा.
- अर्जदाराने मागील परीक्षा 55% गुणासह उत्तीर्ण केलेले असणे गरजेचे आहे. त्यापेक्षा कमी असेल तर तो अपात्र राहणार.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा जास्त नसावे.
- बारावी नंतरचे विद्यार्थी सुद्धा व डिप्लोमा करणारे या शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार.
HDFC BANK PARIVARTAN’S ECSS SCHOLARSHIP कागदपत्रे कोणती?
- अर्जदाराच्या मागील वर्षाच्या सर्व गुणपत्रिका.(2023-2024)
- अर्जदाराचा ओळख पुरावा.(VOTING ID CARD/ DRIVING LICENCE)
- आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे)
- चालू वर्षाचे शैक्षणिक प्रवेश पत्र व बोनाफाईट.
- तहसीलदाराचा उत्पादनाचा दाखला.
- कौटुंबिक संकट असल्याचा प्रतिज्ञापत्र
HDFC BANK PARIVARTAN’S ECSS SCHOLARSHIP अर्ज कसा करायचा?
- सर्वप्रथम अर्जदाराने एचडीएफसी बँक तर्फे जारी केलेल्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावे. (येथे क्लिक करा)
- अर्जदाराने आपली शैक्षणिक माहिती जसे की ITI/ 1 to 12th /UG/PG ज्या शैक्षणिक वर्षाला शिकत असेल ते पर्यावरण जाऊन Apply Now वर ती क्लिक करावे.
- त्यानंतर अर्जदाराने Login करून घ्यावे.
- आधार कार्ड व्हेरिफाय चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून Aadhar Card Verify करून घ्यावे.
- त्यानंतर अर्जदाराने त्याची वैयक्तिक माहिती व ऍड्रेस (Personal information/Adress)भरून घ्यावा.
- त्यानंतर अर्जदाराने शैक्षणिक व शालेय माहिती भरून घ्यावी.
- अर्जदाराने मागील वर्षीच्या गुणपत्रिका ऍडमिशन स्लिप बोनाफाईट इनकम सर्टिफिकेट बँक पासबुक प्रूफ ऑफ क्राइसेस (Marksheets/Admission slip/Bonafide/Income Certificate/Bank Passbook/Proof of Crisis)ही सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- ही सर्व माहिती अचूकपणे योग्य पडताळणी करून अर्ज सबमिट करावा.
अशाप्रकारे तुम्ही एचडीएफसी बँक परिवर्तन स्कॉलरशिप चा अर्ज करू शकता.