How to get Ration Card Online
नमस्कार मित्रांनो जर तुमचं रेशन कार्ड हरवला आहे तर घाबरायचं काही कारण नाही तर आज आपण घरबसल्या मोबाईल च्या सहाय्याने रेशन कार्ड कसे काढता येईल याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
रेशन कार्ड हे दैनंदिन जीवनातील अतिशय महत्त्वाचं कागदपत्र आहे. रेशन कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून व देशातील गरिबांना मोफत धान्य मिळवण्यासाठी रेशन कार्डचा वापर केला जातो.(How to get Ration Card Online)
जर आपल्या रेशन कार्ड हरवला असेल तर आपल्याला रेशन कार्ड मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाही व सरकारी कार्यालयात जाण्याचे काहीच गरज भासणार नाही आता तुम्ही मोबाईलवरून रेशन कार्ड काढू शकता व जर कुटुंबातील व्यक्तीचे नाव रेशन कार्ड मधून काढायचे असेल व कुटुंबातील व्यक्तीचे नाव रेशन कार्ड मध्ये चढवायचे असेल ही सर्व कामे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून करू शकता. त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा वाचेल.
Ration Card संबंधित ऑनलाईन कोणती कामे करू शकणार.
1) कुटुंबातील एका नव्या सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये चढवू शकता.
2) कुटुंबातील सदस्याचे नाव रेशन कार्ड मधून काढायचे असेल तर तेही काम करू शकता.
3) रेशन कार्ड चे स्टेटस तुम्ही घरबसल्या तपासू शकता.
4) इ रेशन कार्ड हे राज्य सरकारने जारी केलेल्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड देखील करू शकता.
PM Vishwakarma Yojana 2024 : जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती!
e Ration Card साठी अर्ज कोण पात्र ठरणार
1) भारतातील कोणतीही व्यक्ती रेशन कार्ड साठी अर्ज करू शकते फक्त तो भारताचा नागरिक असावा.
2) 18 वर्षावरील व्यक्ती हे वेगळ्या रेशन कार्ड साठी अर्ज करण्यास पात्र असेल.
3) अठरा वर्षाखाली मुली किंवा मुलीचे नाव रेशन कार्ड मध्ये चढवू शकणार.
e Ration Card साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
1) सर्वप्रथम ई रेशन कार्ड बनवण्यासाठी राज्य शासनाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावे लागणार. व https://mahafood.gov.in या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.(How to get Ration Card Online)
2) त्यानंतर तुम्हाला अप्लाय ऑनलाईन रेशन कार्ड (Apply Online Ration Card) हा पर्याय दिसेल व या पर्यायावर क्लिक करावे.
3) आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स हेल्प कार्ड पासपोर्ट व मतदान ओळखपत्र इत्यादी ही सर्व कागदपत्रे रेशन कार्ड बनवण्यास लागणार.
4) रेशन कार्ड बनवण्यासाठी 5 ते 45 पर्यंत शुल्क घेण्यात येईल व तसेच अर्ज भरून झाल्यानंतर शुल्क भरून सबमिट करावे.
5) शुल्क भरून झाल्यावर तुम्हाला फील व्हेरिफिकेशन करावे लागेल व फील व्हेरिफिकेशन झाल्यावर जर तुमच्या अर्जामध्ये त्रुटी न आढळल्यास तुम्ही रेशन कार्ड साठी पात्र राहणार.
ई Ration Card साठी लागणारी कागदपत्रे
1) पत्त्याच्या पुराव्यासाठी विजेचे बिल, टेलिफोन बिल ,बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, गॅस कनेक्शन ई.
2) पॅन कार्ड
3) उत्पन्नाचा दाखला
4) पासपोर्ट साईज फोटो
5) आधार कार्ड
6) मतदान ओळखपत्र
7)हेल्थ कार्ड
8) ड्रायव्हिंग लायसन्स
मेरा रेशन2.0 App वरती माहिती कशी बघायची.
सर्वप्रथम आपण गुगल प्ले स्टोअर वरून मेरा रेशन 2.2 ॲप डाऊनलोड करून घ्यावे. मेरा रेशन 2.0 या ॲपच्या सहाय्याने रेशन कार्ड संबंधित कामे करू शकणार व त्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च लागणार नाही.
सर्वप्रथम मेरा रेशन 2.2 ॲप डाऊनलोड करावे. व ते आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यावे.
इन्स्टॉल करून झाल्यानंतर त्या आपला ओपन करावे ओपन केल्यावर डॅशबोर्ड तुमच्यासमोर उघडलेला दिसेल.
आता सर्व सुविधा तुम्हाला त्या ॲप वरती दिसेल. तिथे दिलेल्या ज्या सुविधेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल त्यावर क्लिक करावे व त्या संबंधित तिथे लागणारी आवश्यक माहिती टाकावी.
अर्जाचे स्टेटस कसे बघू शकणार
रेशन कार्ड साठी अर्ज केल्यावर घरबसल्या आपल्या अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकता येते यासाठी डिपार्टमेंट ऑफ पुढच्या अधिकृत https://mahafood.gov.in या वेबसाईटवर जावे लागते.
त्यानंतर सर्वप्रथम सिटीजन कॉर्नर या सेक्शन वर क्लिक करावे.
त्यानंतर ट्रॅक फूड सिक्युरिटी एप्लीकेशन हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करावे.
यामध्ये चार पर्याय दिसेल यातील चार पर्यायांपैकी एक भरा आता तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकणार.