HSRP NUMBER PLATE APPLY ONLINE: नमस्कार मित्रांनो HSRP (High Security Registration Plate) नंबर प्लेट ही सर्व वाहनांसाठी एक एप्रिल 2025 पासून बंधनकारक करण्यात आली होती. पण काही कारणामुळे मुदत वाढवून देण्यात आली आहे. 30 November 2025 ही शेवटची तारीख आहे या तारखे पर्यंत HSRP Number plate बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.जर या नियमांचे पालन न केल्यास दंड आकारण्यात येणार आहे. तर 2 wheeler/3wheeler/4 wheeler, heavy Vehicle. etc. या सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य केले आहे.
जुन्या वाहनांवर ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) बसवण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा *३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली* आहे.
यानंतरही ज्या वाहनांवर ‘एचएसआरपी’ प्लेट नसेल, त्यांच्यावर १ डिसेंबरपासून वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिला आहे.
या HSRP नंबर प्लेट साठी कोणती कागदपत्रे लागतात? ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत.(HSRP NUMBER PLATE APPLY ONLINE)
FARMER ID CARD 2024: फार्मर आयडी कार्ड काय आहे? जाणून घ्या!
HSRP NUMBER PLATE 2025: काय आहे?
HSRP म्हणजे High security Registration Plate. वाहनांची चोरी थांबवणे व वाहनांची सुरक्षा वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकार तर्फे 2019 वर्षाच्या पूर्वीच्या वाहनांना नोंदणी करत असलेल्या दुचाकी चार चाकी व जड वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे हे अनिवार्य केले आहे.
शेतकऱ्यांसाठी पण ट्रॅक्टर व पिक वाहून येणाऱ्या वाहनांना हा नियम लागू असणार आहे. HSRP Number plate वरती एक युनिक पिन नंबर Unique Pin Number दिलेला असतो. या नंबरच्या आधारे वाहनांचा डेटाबेस Data Base सुरक्षित राहतो आणि वाहन चोरी किंवा अपघात झाल्यास या युनिक पिन नंबर द्वारे वाहनांची सहज माहिती ही उपलब्ध होते.
जर दिलेल्या अंतिम मुदतीमध्ये एचएसआरपी नंबर प्लेट नाही बसविले तर एचएसआरपी नियमांचे उल्लंघन मानून दंड आकारण्यात येणार आहे त्यात चालकास शिक्षा पण होऊ शकणार पाच हजार रुपये ते दहा हजार रुपये हा दंड असू शकतो.
याच्यासाठी नंबर प्लेट ही ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे तसेच होम डिलिव्हरी सुद्धा करण्यात येणार आहे करता येणार आहे वाहनांच्या प्रकारावरून याचे सार पी प्लेटची ऑनलाइन फी ठरविण्यात आली आहे
महाराष्ट्रात HSRP नंबर प्लेट का लागू करण्यात आली आहे?
महाराष्ट्र राज्य सरकारने HSRP नंबर प्लेट्स लागू करण्याची घोषणा केली आहे. या HSRP ( High Security Number Plate) प्लेट्सद्वारे वाहनांची ओळख जास्त सुरक्षित होईल आणि वाहतूक नियमनात सुधारणा होईल. वाहन चोरी कमी होईल आणि वाहने योग्य रजिस्ट्रेशन प्रक्रियेत येतील.
HSRP नंबर प्लेट बनवण्यास किती खर्च लागणार?
- 2 Wheeler : 531/-rs
- 3 Wheeler : 590/-rs
- LMV(Light Motor Vehicle)/MCV (Medium Commercial Vehicle)/HCV (Heavy Commercial Vehicle) : 879/-rs
HSRP NUMBER PLATE साठी कागदपत्रे कोणती?
- Vehicle RC (Registration Certificate)
- ADRESS Proof
- Identity Proff
HSRP NUMBER PLATE APPLY ONLINE
- सर्वप्रथम शासनाने जाहीर केलेल्या शासकीय वेबसाईटला वरती जावे. (येथे क्लिक करा)
- वेबसाईट वरती गेल्यानंतर मेनू मध्ये एचआरपी ऑनलाईन बुकिंग (HSRP online booking) हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे
- त्यानंतर नवीन पेज ओपन होणार त्यामध्ये अप्लाय हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन (Apply High Security Registration Plate Online)असा विंडो ओपन होणार त्यानंतर तुमच्या जवळचा आरटीओ ऑफिस सिलेक्ट करून घ्यावे. त्
- यानंतर पुन्हा नवीन पेज ओपन होणार त्यामध्ये बुक हाई सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (Book High Security Registration Plate) या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यानंतर अर्जदाराने Booking Details ex.(State, registration number, chassis number,engine number,etc) इ.माहिती भरून घ्यावी.
- त्यानंतर दुसऱ्या option मध्ये Affilation Location, Appointment slot, Booking summery, व सर्वात शेवटी Online Fees भरून घ्यावी.
- अशा प्रकारे HSRP Number plate साठी Online Apply करू शकता.