नमस्कार मित्रांनो लेक लाडकी योजना महाराष्ट्र मध्ये सुरू झालेली आहे या योजनेचा फायदा काय? या योजनेमुळे मुलींना किती रुपये मिळणार? व कागदपत्रे कोणती ? व अर्ज कसा करायचा ? याबद्दल आपण सविस्तर माहिती या लेखात बघणार आहोत.
LEK LADKI YOJANA 2025 : काय आहे ही योजना?
राज्यामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी ही लेक लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकार तर्फे गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी व कल्याणसाठी ही लेक लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे ही योजना राबवण्याचे उद्दिष्ट असे की महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे या योजनेच्या वतीने राज्यातील गरीब घरातील मुलींना लखपती करणार असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.(Lek ladki yojna 2025)
पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबाच्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे व मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर अंतिम रक्कम ही दिली जाणार या योजनेमुळे लैंगिक समानतेला प्रोत्साहन मिळणार व मुलींना मुलाप्रमाणेच समान संधी प्राप्त होणार हा मुख्य हेतू या लेक लाडकी योजनेचा आहे.(LEK LADKI YOJANA 2025)
या योजनेचा लाभ घेणाऱ्या मुलींना त्यांच्या जन्मापासून ते अठरा वर्षे वयापर्यंत आर्थिक राशी दिली जाणार आहे ही राशी एक लाख एक हजार रुपये अशी एकूण पाच टप्प्यांमध्ये दिली जाणार आहे.
- जन्म झाल्यावर 5000 हजार रुपयांचा लाभ
- 1 ली मध्ये गेल्यावर 6000 हजार रुपयाचा लाभ
- 6 वी मध्ये गेल्यावर 7000 हजार रुपयांचा लाभ
- 11 वीत गेल्यावर 8000 हजार रुपयाचा लाभ
- 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपयाचा लाभ
अशा एकूण पाच टप्प्यांमध्ये एक लाख एक हजार रुपये ही रक्कम इतका लाभ मिळणार आहे.
MUKHYAMANTRI TIRTH DARSHAN YOJNA : योजना काय आहे ? योजना जाणून घेऊया!
LEK LADKI YOJANA 2025 : उद्देश काय?
- मुलींच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश योजनेचा आहे.
- मुलींना शैक्षणिक संधी प्राप्त व्हावी व मुलगी स्वावलंबी आणि सक्षम बनावी.
- मुलींचा जन्मदर वाढवणे व मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे.
- मुलींचा आर्थिक भार कमी करणे व बालविवाह थांबवणे.
- मुलीचे जन्मदर वाढवणे व कुपोषण कमी करणे.
LEK LADKI YOJANA : योजनेच्या अटी
- एक एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर मुलींचा जन्म झालेला असावा.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा जास्त नसावे व जास्त असेल तर या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात येणार.
- लाभार्थीच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय सेवेत नसावा.
- या योजनेचा लाभ फक्त केशरी व पिवळा रेशन कार्ड धारकांनाच मिळेल.
- लाभार्थी मुलगी भारत देशाची नागरिक असावी.
- १ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याचप्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास, दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार.
LEK LADKI YOJANA : साठी लागणारी कागदपत्रे?
- अर्जदाराचा व पालकाचा आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक.)
- पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असणे आवश्यक.
- वार्षिक उत्पन्नाचा पुरावा.
- अर्जदार मुलीचा जन्माचा दाखला.
- पालक किंवा लाभार्थी यांचा बँक अकाउंट.
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो.
LEK LADKI YOJANA : अर्ज कसा करायचा?
- सर्वप्रथम शासनाने जारी केलेल्या अधिकृत वेबसाईट वरती जावे. येथे क्लिक करा.
- योजनेच्या लाभार्थीची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांची राहील.
- ग्रामीण भाग : अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका
- नागरी भाग : अंगणवाडी सेविका / मुख्यसेविका