WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MAHAJYOTI MBA CAT CMAT CET YOJNA 2025 : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर त्वरित अर्ज करा!

MAHAJYOTI MBA CAT CMAT CET YOJNA 2025

नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र सरकार तर्फे राबवल्या जाणाऱ्या महाज्योती एमबीए सी सेट सिमेंट सीईटी (MAHAJYOTI MAHAJYOTI MBA CAT CMAT CET YOJNA 2025)  प्रवेश परीक्षांच्या प्रशिक्षण योजनेबद्दल ही योजना काय आहे या योजनेचे पात्रता काय याबद्दलची सर्व माहिती आपण या लेखात बघणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा.(Mahajyoti MBA CET Registration)

MAHAJYOTI MBA CAT CMAT CET YOJNA 2025 : काय आहे ही योजना?

भारत देशामध्ये जागतिक उद्योग सेवा व मोठमोठ्या कंपन्यांची गर्दी वाढलेली आहे आता या सर्व कंपन्यांना गरज भासत आहे ते म्हणजे कुशल मनुष्यबळाची त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे  कौशल्य आहे ते म्हणजे व्यवसाय व्यवस्थापनाचे (MBA). MBA म्हणजे Master in Business Administration या कौशल्याचे शिक्षण घेऊन विद्यार्थी हे उद्योग जगतामध्ये सहभागी होऊ शकतात.

एमबीए MBA करण्यासाठी देशभरात अनेक नामांकित विद्यापीठे आणि महाविद्यालय उपलब्ध आहे. मात्र मोठ मोठ्या नामांकित विद्यापीठांमध्ये एमबीए मध्ये प्रवेश घेण्यासाठी CAT किंवा CMAT अशा राज्य व राष्ट्रीय स्तरावरील  Entrance Exam द्यावा लागतात.

या परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना महागडे क्लासेस लावावे लागतात व गाव सोडून शहरांमध्ये राहावं लागतं. यासाठी अमाप वेळ व पैसा खर्च होतो. पदवी झाल्यानंतरही उमेदवाराला आपल्या कुटुंबाच्या आर्थिक मदतीवर अवलंबून राहावे लागते.(MAHAJYOTI MBA CAT CMAT CET YOJNA 2025)

यासाठीच महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती मार्फत महाराष्ट्र राज्यातील नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय अर्थात OBC/VJ,NT विमुक्त जाती भटक्या जमाती/ विशेष मागासवर्गातील SBC विद्यार्थ्यांसाठी MBA CAT/CMAT CET या प्रवेश परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे .(Mahajyoti MBA CAT)

ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सहा महिन्याच्या प्रशिक्षणासोबत दरमहा दहा हजार रुपये 10,000 विद्या वेतन आणि बारा हजार 12,000 रुपयांचा आकस्मित निधी देण्यात येणार आहे.

महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती मार्फत MBA-CAT/CMAT-CET च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने  प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

सदर प्रशिक्षणासाठी  प्रशिक्षणार्थ्याची निवड ही सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात कॉमन इंटरेस्ट सिटीद्वारे प्राप्त गुणांच्या आधारे केली जाईल.

DR.B.R AMBEDKAR SWADHAR YOJNA : काय आहे योजना? जाणून घेऊया!

विद्या वेतन किती?

  1. प्रतिमाह विद्यावेतन – 10,000/-  (किमान 75% उपस्थिती असल्यास)
  2. आकस्मिक निधी- 12000/- (एकवेळ)
  3. एकूण 22,000/- रूपये मिळणार व प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने राहील.

आरक्षण (Reservation) सामाजिक प्रवर्ग

  1. इतर मागास वर्ग (OBC) = 59%
  2. विमुक्त जाती- अ (VJ-A) = 10%
  3. भटक्या जमाती व (NT-B) = 8%
  4. भटक्या जमाती क (NT-C) = 11%
  5. भटक्या जमाती ड (NT-D) = 6%
  6. विशेष मागास प्रवर्ग (SBC) = 6%

समांतर आरक्षण

  1. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.
  2. दिव्यांगाकरिता 5% जागा आरक्षित आहे.
  3. प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.

पात्रता व निवड प्रक्रिया

  1. अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी.
  2. अर्जकर्ता उमेदवाराने पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली  असावी.
  3. विद्यार्थी हा नॉन-क्रिमिलेअर (non creamylayer) OBC/VJ,NT/SBC गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा किंवा असावी.
  4. अर्जदार विद्यार्थी हा यापुर्वी महाज्योतीच्या योजनांचा कोणत्याही स्वरुपात लाभ घेतलेला असेल, अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करु नये, अश्या उमेदवारांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही. व त्यांना अपात्र ठरविण्यात येणार.
  5. प्रशिक्षणा करीता  विद्यार्थ्यांची निवड Entrance Exam या परिक्षेद्वारे करण्यात येईल.
  6. महाज्योती MBA-CAT/CMAT-CET पूर्व परिक्षा या योजनेसाठी विद्यार्थ्याची अभ्यासक्रमानुसार Entrance Exam परीक्षा घेण्यात येईल.
  7. Entrance Exam परीक्षेचे वेळापत्र हे महाज्योतीच्या Official संकेतस्थळावर  उपलब्ध करुन देण्यात येणार.
  8. Entrance exam या परीक्षेत प्राप्त गुणां नुसार मेरीटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार.

कागदपत्रे कोणती ?

  1. जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
  2. आधार कार्ड
  3. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
  4. रहिवासी दाखला (Domicile Certificate)
  5. पदवीचे प्रमाणपत्र/गुणपत्रिका
  6. अनाथ असल्यास दाखला
  7. दिव्यांगाचे प्रमाणपत्र (दिव्यांग असल्यास)

प्रशिक्षणाचे स्वरूप काय असणार !

  1. सदर प्रशिक्षण अनिवासी स्वरुपाचे व प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्यांचा असेल.
  2. MBA-CAT/CMAT-CET परीक्षा पूर्व प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरुपात देण्यात येईल
  3. विद्यार्थ्यांना परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रमानुसार MBA-CAT/CMAT-CET परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यात येईल.

अर्ज कसा करायचा?(Mahajyoti MBA CET Registration)

  1. सर्वप्रथम महाज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावे. येथे क्लिक करा.
  2. Application for MBA-CAT/CMAT-CET-2025-26 Training” या पर्याया वर क्लिक करून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
  3. सर्व कागदपत्राची पडताळणी करून योग्यरीत्या अर्ज करून घ्यावा.

Leave a Comment