MAHARASHTRA POLICE BHARTI 2025
पोलीस बनण्याची स्वप्न बघणाऱ्या तरुण-तरुणीसाठी राज्य सरकारने पोलीस भरतीची खुशखबर दिली आहे. राज्य सरकारने पोलीस दलातील तब्बल 10 हजार पदासाठी पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.(MAHARASHTRA POLICE BHARTI 2025)
मित्रांनो राज्यात पोलीस भरतीसाठी यावर्षी पुन्हा एक तरुण-तरुणींसाठी संधी प्राप्त होणार आहे. ज्या तरुण तरुणींनी पोलीस होण्याचे स्वप्न बाळगले आहे. त्यांनी पोलीस भरतीच्या कामाला लागले पाहिजे. मित्रांनो अशी संधी पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही म्हणून तुम्ही या संधीचं सोनं करायला हवं. (MAHARASHTRA POLICE BHARTI 2025)
RRB GROUP D BHARTI 2025 : भारतीय रेल्वेमध्ये 32,000 Group D या पदाकरिता भरती!
MAHARASHTRA POLICE BHARTI 2025
मित्रांनो राज्यात फेब्रुवारीनंतर दहा हजार पदे भरली जाणार आहे राज्याची वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच वाढत असलेल्या गुन्ह्याची सरासरी टक्केवारी वाढत चालली आहे.
त्यामुळे पोलिसांच्या मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे आपण पोलीस महासंचालक यांनी सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना निर्देश देत.
डिसेंबर 2024 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदाची माहिती व एकूण पोलिसांची रिक्त पदे किती? असे दोन वर्षातील रिक्त पदांची ही सर्व माहिती मागवली आहे.व काही दिवसातच भरती प्रक्रिया सुरू होईल अशी सूचना देण्यात आलेली आहे.
पोलीस भरतीची मैदानी चाचणी पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती मिळाली आहे व दोन वर्षातील रिक्त पदाचा आढावा घेऊन आगामी काळात भरती पार पडेल व भरतीचे नियोजन जाहीर केले जाईल. अशी माहिती अपर पोलीस महासंचालक यांच्याकडून मिळालेले आहे.