MUKHYAMANTRI TIRTH DARSHAN YOJNA
नमस्कार मित्रांनो राज्य शासना तर्फे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (MUKHYAMANTRI TIRTH DARSHAN YOJNA) सुरू करण्यात आलेली आहे या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात ? व अर्ज कसा करायचा ? या योजनेतून शासन किती खर्च उचलते? याबद्दल आपण सर्व माहिती या लेखात बघणार आहोत.
MUKHYAMANTRI TIRTH DARSHAN YOJNA : योजना काय आहे ?
वृद्धापकाळमध्ये अनेकांची तीर्थदर्शनाची इच्छा असते परंतु हाती पैसा नसल्याने ती इच्छा तशीच अधुरी राहून जाते.गोरगरीब, सर्वसामान्य कुंटूबातील जेष्ठ नागरिक त्याच्या आर्थिक परीस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक जेष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही.
परंतु सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य जेष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळाना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पटली गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील जेष्ठ नागरिक जे ६० वर्ष किवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी शासनाने राज्यातील साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (MUKHYAMANTRI TIRTH DARSHAN YOJNA) ही सुरू करण्यात आली आहे.
त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांकडे पैसे नसतानाही तिथे दर्शन घडवून यावे यासाठी ही योजना अमलात आणण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी देवी यात्रा तसेच इतर धर्मियाचीही मोठी तीर्थस्थळे आहेत.
या योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती प्रवास खर्चासाठी 30 हजार रुपये हे अनुदान म्हणून देण्यात येते.या मध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास, इत्यादी सर्व बाबींचा समावेश राहील. या योजनेमुळे भारतातील 14 प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेट देण्यात येते तसेच महाराष्ट्रातील ९५ तीर्थक्षेत्रे व यात शक्तिपीठे तसेच ज्योतिलिंगचाही समावेश करण्यात आलेला आहे या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येणार आहे.
MUKHYAMANTRI TIRTH DARSHAN YOJNA : पात्रता काय?
- या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील ६० वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरिक पात्र राहणार.
- लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. उत्पन्न जास्त असेल तर लाभार्थी अपात्र ठरणार.
- वैदयकिय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार.
MUKHYAMANTRI TIRTH DARSHAN YOJNA : कागदपत्रे कोणती?
- लाभार्थ्यांचे आधारकार्ड / रेशनकार्ड
- शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र
- महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमाक
- सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटूंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला किवा पिवळे / केशरी रेशनकार्ड
- सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
- सदर योजनेची अर्ज भरण्याची प्रक्रिया पोर्टल / मोबाईल अॅपद्वारे / सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात.
MUKHYAMANTRI TIRTH DARSHAN YOJNA : अर्ज कसा करायचा ?
- अर्जदारांनी योजनेच्या विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज शासन निर्णयात नमुद अटीनुसार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालयात सादर करावा.
- तसेच सर्व तहसील कार्यालय, सर्व पंचायत समिती कार्यालय येथे अर्ज सादर करता येईल.
NOTE : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या लाभासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडे अर्ज करावा. लागतो. परंतु, सध्या ही प्रक्रिया बंद झालेली आहे. पुढील आर्थिक वर्षात अर्ज सादरीकरणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा नागरिकांना या योजनेकरिता अर्ज करता येणार आहे.