Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024
नमस्कार मित्रांनो तर आज आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसेच ही योजना काय आहे या योजनेसाठी काय पात्रता आहे व कागदपत्रे कोणती लागतात याबद्दलची आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana काय आहे?
मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना ही राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर त्यांना प्रशिक्षण देऊन नोकरीची संधी प्राप्त व्हावी यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे इच्छुक उमेदवाराला या प्रशिक्षणातून प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार.प्रशिक्षणार्थी म्हणून उमेदवाराला त्यांचे कौशल्य विकसित करण्याची आणि पुढे जाऊन, त्याला त्याच्या पात्रतेची आणखी चांगली नोकरी, व्यवसाय, उद्योग यांची निवड करता येणार आहे. राज्याची ही फ्लॅगशीप योजना आखली आहे.
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना हीच लाडका भाऊ योजना आहे.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने करीता ५ हजार ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी १ असे एकूण ५० हजार योजनादूत नेमणार.
प्रत्येक आर्थिक वर्षात १० लाख कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) च्या संधी उपलब्ध होणार.शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविणे गरजेचे.उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत १२ वी उत्तीर्ण- रु.६ हजार, आय.टी.आय व पदविका उत्तीर्ण- रु.८ हजार, पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण रु.१० हजार दरमहा विद्यावेतन मिळणार.
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 साठी पात्रता काय?
1) या योजनेसाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष या दरवाजा असावे
2) उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
3) राज्यातील दहा लाख तरुण-तरुणींना या योजनेचा लाभ मिळणार
4) व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या तरुण-तरुणी या योजनेसाठी पात्र राहणार त्यांना या योजनेचा लाभ मिळणार.
5) ज्या उमेदवाराचे शिक्षण चालू असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही
6) या योजनेचा प्रशिक्षण कालावधी सहा महिने असेल व सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना शासनमार्फत योग्य तो वेतन दिले जाईल.
7) या योजनेसाठी शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास डिप्लोमा व पदवीधर असावा.
8) सदर कार्य प्रशिक्षणचा कालावधी ६ महिने असेल.
9) ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात (DBT) ऑनलाईन पध्दतीने दरमहा अदा करण्यात येईल.
10) प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमदेवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
PM Vidya Lakshmi Yojana 2024 : आता शिक्षणासाठी पैसा अडथळा ठरणार नाही; केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय
(Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024)युवकांना किती रुपये मिळणार?
1) बारावी पास युवकांना दरमहा 6000 हजार रुपये मिळणार
2) डिप्लोमा झालेल्या युवकांना दरमहा आठ हजार रुपये मिळणार
3) पदवीधर युवकांना तर महा 10000 रुपये मिळणार
खालील वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करू शकता?
(मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना) https://www.mahaswayam.gov.in/
युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्या कंपनीमध्ये त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झालं त्या कंपनीकडून त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल व त्या कंपनीला युवकाचे काम योग्य वाटल्यास तिथं त्यांना नोकरी सुद्धा मिळू शकेल