Online Birth & Death Registration 2024 : ऑनलाइन जन्म आणि मृत्यू दाखला कसा काढायचा?
नमस्कार मित्रांनो आपला स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत जन्म आणि मृत्यू दाखला कसा काढायचा व दाखल्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करावा लागेल कागदपत्रे कोणती लागतात. मृत्यू दाखला साठी अर्ज कसा करायचा अर्ज करण्याची पद्धत व आवश्यक कागदपत्रे कोणती या ही सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला अर्ज करण्यास कोणताही त्रास होणार नाही.(Online Birth & Death Registration 2024)
आधार कार्ड आणि पॅन कार्ड प्रमाणेच दैनंदिन जीवनामध्ये जन्म प्रमाणपत्र देखील अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र ठरते. शासकीय कामासाठी किंवा शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी, सरकारी नोकरी मध्ये, ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी जन्म प्रमाणपत्राची गरज भासत असते भासत असते. जर तुम्हाला मोबाईल वरून सोप्या पद्धतीने घरबसल्या जन्म प्रमाणपत्र कसे काढायचे हे आज आपण बघणार आहोत.
सरकारचे अधिकारी दस्तावेज म्हणून जन्म प्रमाणपत्र कडे पाहिलं जातं. जन्मस्थान पूर्ण नाव जन्म दिनांक या सगळ्या महत्त्वाच्या माहितीची जन्म प्रमाणपत्र मध्ये नोंद केलेली असते. मृत्यू नोंदणी हे मृत प्रमाणपत्र मध्ये केली जाते. अशाप्रकारे जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र हे महत्त्वाचे कागदपत्र ठरतात.(Online Birth & Death Registration 2024)
जन्म प्रमाणपत्रासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती?(Online Birth & Death Registration 2024)
1) जन्म घेतलेल्या मुलाच्या हॉस्पिटल मधून मिळालेले दाखले.
2) जन्म घेणाऱ्या मुलीचा किंवा मुलाचा फोटो
3) पालकांचा आधार कार्ड
4) रहिवासी पुरावा (राशन कार्ड, विज बिल)
PM Awas Yojana 2024 : पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्रता काय? ऑनलाइन अन् ऑफलाइन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
जन्म प्रमाणपत्र ऑफलाईन नोंदणी पद्धत.(Online Birth & Death Registration 2024)
1) जिल्ह्यातील जन्म आणि मृत्यू नोंदणी कार्यालयात जावे जन्म प्रमाणपत्रासाठी कार्यालयातून मिळणारा अर्ज घ्यावा व योग्य ती माहिती भरावी.
2) जी फी लागेल ती भरावी व आवश्यक कागदपत्रे गोळा करून अर्ज कार्यालयात जमा करावा.
3) अर्ज जमा केल्यानंतर सात ते पंधरा दिवसांमध्ये जन्म प्रमाणपत्र तयार होणार तयार होईल. त्यानंतर तयार झालेले प्रमाणपत्र तुम्ही कार्यालयातून घेऊ शकता.
जन्म प्रमाणपत्र काढण्याची ऑनलाइन पद्धत.
1) जन्म आणि मृत्यूची नोंदणी करण्यासाठी शासनाने जारी केलेल्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या https://www.urban.maharashtra.gov.in/ या वेबसाईटला भेट दिल्यानंतर. जन्म प्रमाणपत्र नोंदणी अशी बटन दिसणार व त्या बटन वर क्लिक करावे.
2) आवश्यक कागदपत्रे व माहिती ही योग्यरित्या तपासणी करून भरावी. नंतर लागेल ती फी भरावी. व अर्ज सबमिट करावे.
3) तुम्हाला अर्ज क्रमांक आणि पावती मिळेल. 15 दिवसाच्या आत मध्ये जन्म प्रमाणपत्र हे ऑनलाईन जमा होणार जमा झाल्यानंतर तुम्ही ते डाऊनलोड करून प्रिंट काढून घ्यावे.
मृत्यू प्रमाणपत्र कसे काढावे?
1) सर्वप्रथम शासनाच्या महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी या ऑफिशियल वेबसाईटवर ती जावे
2) तिथे मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी ऑप्शन दिसेल व त्यावर क्लिक करावे.
3) लागणारी योग्य तीरी त्या आवश्यक माहिती भरावी. व सबमिट बटनावर क्लिक करावे.
4) त्यानंतर डाउनलोड डाउनलोड मृत्यू प्रमाणपत्र यावर क्लिक करून तुमचे मृत्यू प्रमाणपत्र स्क्रीनवर दिसून येणार तुम्ही ते डाऊनलोड करून प्रिंट काढून घ्यावे.