PAN CARD 2.0 : जुने पॅनकार्ड बंद होणार! जाणुन घ्या माहीती.
नमस्कार मित्रांनो भारत सरकार तर्फे पॅन कार्ड संबंधित मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता जुने पॅन कार्ड होणार बंद आणि नवीन PAN CARD 2.0 लवकरच येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटने पेन 2.0 या योजनेला मंजुरी दिलेली आहे देशभरामध्ये लवकरच पॅन कार्ड मध्ये बदल केले जाणार आहे नव्या पॅन कार्ड म्हणजे पॅन 2.0 या योजनेसाठी केंद्र सरकारतर्फे 1435 कोटी रुपये खर्च करणार आहे अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
कर चुकवेगिरी व कर रचनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पॅन 2.0 ही योजना आणण्यात आली आहे या योजने अंतर्गत पॅन कार्डचे डिजिटलायझेशन होणार आहे तसेच नवीन पॅन कार्ड हे क्यूआर कोड सोबत उपलब्ध होणार आहे व ज्यांचे पॅन कार्ड आधीच बनलेला असेल त्यांना पॅन कार्ड मोफत उपलब्ध करून दिले जाणार अशी माहिती मिळालेली आहे. जुन्या पॅन कार्ड मध्ये काही त्रुटी होत्या व फसवणुकीच्या घटना एखाद्या व्यक्तीची ओळख चोरणे अशा प्रकारच्या गोष्टींना या पॅन कार्ड 2.0 मुळे आळा बसेल
देशात तब्बल 78 कोटी नागरिक हे पॅन कार्ड धारक आहेत. या PAN CARD 2.0 प्रक्रियेस तब्बल 1435 कोटी खर्च केले जाणार आहे.
भारतामध्ये सध्या 78 कोटी पॅन कार्ड धारक आहे मात्र सरकारच्या या घोषणेमुळे अनेक असे प्रश्न तुम्हाला पडले असणारच आपण त्याबद्दल समोर बघूया. पॅन नंबर चेंज होणार काय? नवीन पॅन कार्ड कसे बनवायचे? PAN CARD 2.0चे वैशिष्ट्य काय राहणार ? व हा बदल कशासाठी? या सर्व प्रश्नाबद्दलची माहिती आपण लेखात बघणार आहोत.
पॅन कार्ड म्हणजे काय?
आयकर विभागातर्फे भारतामध्ये सन 1972 या वर्षी पॅन कार्ड परमनंट अकाउंट नंबर (Parmanent Acount Number) हे जारी करण्यात आले होते.
आयकर विभागाकडून टॅक्सची चोरी किंवा टॅक्स मध्ये थकबाजी करणाऱ्या अर्थात करण्यात त्यांची माहिती गोळा करण्यासाठी पॅन कार्ड हे आयकर विभागातर्फे जारी करण्यात आले होते.
(Income tax) इन्कम टॅक्स विभागाकडून एक विशिष्ट प्रकारचे PAN (Permanent Account Number) परमनंट अकाउंट नंबर हे जारी केले जाते . PAN (Permanent Account Number ) नंबर हा दहा अंकी असतो पॅन कार्ड हे विशेषता बँक अकाउंट उघडण्यासाठी, प्रॉपर्टी बाय करण्यासाठी आणि इन्कम टॅक्स भरण्यासाठी इत्यादी मुख्य कामासाठी पॅन कार्डचा उपयोग होत असतो.
PAN CARD 2.0 : नवीन पॅन कार्ड ची वैशिष्ट्ये
- नवीन पॅन कार्ड वरती क्यूआर कोड (QR CODE )दिले जाणार ज्यामध्ये पॅन कार्ड धारकांची माहिती असणार.
- पॅन कार्ड नंबर बदलला जाणार नाही. जुनं पॅन कार्ड नंबर कायम राहणार.
- फसवणुकीला आळा घालण्यासाठी व सुरक्षा तंत्रज्ञानात वाढ करण्यासाठी विशेष फीचर्स पॅन कार्ड २.० साठी राहणार.
- आर्थिक व्यवहार सोयीचे व्हावे यासाठी पॅन कार्ड PAN CARD 2.0 आणण्यात आले आहे.
PAN CARD 2.0 साठी काय करावे?
- पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी कुठलीही पैसे द्यावे लागणार नाही.
- विनामूल्य पॅन कार्ड अपग्रेड केले जाणार.
- पॅन कार्डधारकांना कुठेही अर्ज करण्याची गरज नाही.
- सरकारतर्फे पॅन कार्ड साठी थेट पत्त्यावर घरपोच सेवा दिली जाणार.
- नवीन पॅन कार्ड येईपर्यंत जुन्या पॅन कार्डस मान्यता राहील.
- जर ज्या व्यक्तीकडे चुना पॅन कार्ड असेल त्यांना पॅन 2.0 साठी अर्ज करण्याची काहीही आवश्यकता नाही पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे गरजेचे आहे.
नवीन पॅन कार्ड कसे बनवायचे?
- पॅन कार्ड बनवण्यासाठी जवळच्या पॅन कार्ड सर्विस एजन्सीला भेट द्यावी.(PAN CARD)
- प्रत्यक्ष स्वरूपात पॅनकार्ड काढण्यासाठी 107 रुपये व ई पॅनकार्ड काढण्यासाठी 72 रुपये फी स्वरूपात आकारण्यात येते.
- अर्जदाराचे नाव आधार कार्ड नंबर व वैयक्तिक माहिती योग्यरीत्या पडताळणी करून घ्यावी.
- अर्जदाराची माहिती पडताळणी करून झाल्यानंतर पॅन कार्ड साठी अर्ज भरून घ्यावा.
- त्यानंतर तुम्हाला ॲक knowlegement नंबर मिळेल.
- या अक्नॉलेजमेंट नंबरचा उपयोग करून तुम्ही तुमच्या पॅन कार्ड चे स्टेटस बघू शकता.