PM Awas Yojana 2024 (प्रधानमंत्री आवास योजना)
नमस्कार मित्रांनो तर आज आपण माहिती बघणार आहोत प्रधानमंत्री आवास योजने बाबत. या योजनेची पात्रता काय आहे व अर्ज कसा भरायचा याबद्दल आपण सविस्तर माहिती समोर पाहणार आहोत.
प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकार तर्फे चालू करण्यात आलेली आहे या योजनेचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील वेगळं नागरिकांना पक्के घर उपलब्ध व्हावे यासाठी ही योजना राबवली जाते. योजनेअंतर्गत जे ग्रामीण नागरिक कच्च्या घरामध्ये राहतात त्यांना पक्के घर बनवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे आर्थिक सहायता देण्यात येते. (PM Awas Yojana 2024)
या योजनेची सुरुवात 25 जून 2015 पासून सर्वांसाठी घरे या प्रधानमंत्री आवास योजनेला सुरुवात करण्यात आली. नंतर काही वर्षांनी योजना ग्रामीण व नागरी या दोन भागांमध्ये निर्मिती करण्यात आली.
पंतप्रधान आवास योजनेचे 2 प्रकार पडतात
|
PM Awas Yojana साठी काय आहे पात्रता?
1) या योजनेसाठी अर्ज करणारा भारत देशाचा नागरिक असावा.
2) ज्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती हे सरकारी सेवेमध्ये नसावे ते कुटुंब योजनेसाठी पात्र राहणार नाही
3) योजनेसाठी अर्ज करणाऱ्याच्या नावाने घर नसावे.
4) या योजनेचा एकदाच लाभ घेता येतो व अर्जदार या योजनेचा आधी लाभ घेतलेला नसावा
5) अठरा वर्षापेक्षा कमी अर्जदार योजनेसाठी पात्र राहणार नाही.
6) ग्रामीण क्षेत्रातील अर्जदाराला योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न हे सहा लाख रुपये याच्या आत मध्ये असावे व तसेच शहरी क्षेत्रातील अर्जदाराला वार्षिक उत्पन्न हे 18 लाख रुपयांच्या आत्महत्या असावे.
PM Surya Ghar Yojna 2024 : 300 यूनिटपर्यंत मोफत वीज मिळवा, असा करा या योजनेसाठी अर्ज
(PM Awas Yojana 2024) साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती?
1) आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक)
2) पॅन कार्ड
3) बँक पासबुक (आधार कार्ड लिंक असणे आवश्यक)
4) जात प्रमाणपत्र (कास्ट सर्टिफिकेट)
5) उत्पन्नाचा दाखला (इनकम सर्टिफिकेट)
6) रहिवासी दाखला
प्रधानमंत्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
1) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे. (इथे क्लिक करा)
2) अधिकृत वेबसाईट वरती गेल्यावर होम पेज वरती जाऊन ऑनलाईन अर्ज या ऑप्शन वरती क्लिक करा.
3) अर्जासाठी जी माहिती लागेल ती माहिती अचूक भरावी.
4) त्यानंतर योजनेसाठी जी आवश्यक कागदपत्र लागतात ती योग्यरीत्या तपासून अपलोड करावी.
5) त्यानंतर तिथे फायनल सबमिट नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून अर्ज सबमिट करावे.
6) अशा प्रकारे तुम्ही पीएम आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता