PM Surya Ghar Yojna 2024: नमस्कार मित्रांनो आपल्या या आजच्या पोस्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पीएम सूर्य घर योजना काय आहे व 300 युनिट आपण कसं मोफत मिळवू शकणार याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
मित्रांनो जर आपल्याला PM Surya Ghar Yojna 2024 योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही पोस्ट आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे नेमकी ही योजना कोणासाठी आहे? या योजनेचे उद्देश काय आहे? आणि या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतील व या योजनेसाठी पात्रता काय आहे? तसेच पीएम सुरेखा योजनेचा ऑनलाइन अर्ज कसा करायचा याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
PM Surya Ghar Yojna 2024 : योजनेचा मुख्य उद्देश
केंद्र सरकारने सुरू केलेल्या सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांच्या घराच्या छतावरती सौरव पॅनल बसवून सौर ऊर्जेला चालना देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच लोकांच्या उत्पन्नात मोठी वाढ व्हावी आणि आणि लोक वरती विज बिल चा खर्चाचा बोजा हा कमी व्हावा.
पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत विजेसाठी छतावरील सौर पॅनल चा वापर होत असल्यामुळे पर्यावरणाला स्वच्छ राहण्यास व पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
PM Surya Ghar Yojna : काय आहे योजना ?
PM Surya Ghar Yojna अंतर्गत अर्जदाराला सौर पॅनल खरेदी करण्यासाठी सरकारकडून सहाय्यक मदत म्हणून अनुदान दिले जाते.जर एखाद्या व्यक्तीने सूर्य घर योजना अंतर्गत आपल्या घराच्या छतावर ती सौर पॅनल विकत घेतले तर सरकारकडून 1 किलो वॅटच्या सौर पॅनल ला 30,000 रुपये व 2 किलोवॅटच्या सौर पॅनल वर 60,000 रुपये आणि तसेच 3 किलोवॅटच्या सौर पॅनलवर 78,000 रुपये अनुदानित रक्कम दिली जाते. (PM Surya Ghar Yojna 2024)
PM Surya Ghar Yojna ने साठी पात्रता काय?
1) भारतातील सर्व समुदायातील नागरिक या योजनेसाठी पात्र असणार.
2) सर्वात महत्वाची बाब म्हणजे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या कुटुंबातील कुणी सदस्य सरकारी नोकरीवर नसावा.
3) अर्जदाराचा आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे.
4) अर्जदाराकडे स्वतःचे वीज बिल कनेक्शन असणे आवश्यक आहे.
पीएम सूर्योदय योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
– आधार कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे
– मोबाईल नंबर
– वीज बिल
– रेशन कार्ड
– उत्पन्नाचा दाखला चालू वर्षाचा
– फोटो
– प्रतिज्ञापत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र
पीएम सूर्योदय योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
* या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला https://www.pmsuryaghar.gov.in/ या ऑफिशियल वेबसाईट वरती जावे. नंतर होम पेज वरती जाऊन Apply for Rooftop Solar यावर क्लिक करावे.
* यानंतर तुम्हाला राज्य निवडण्याचा पर्याय आलेला दिसेल. यामध्ये आपण आपले राज्य निवडावे.
* त्यानंतर तुम्ही तुमची वीज वितरण कंपनी निवडावी.
• आता तिथे तुमचा चालू मोबाईल नंबर व ग्राहक क्रमांक टाकावा.
* त्यानंतर मोबाईल वरती ओटीपी येणार मोबाईल वर आलेला ओटीपी टाका, कॅपच्या भरात आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
* सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या रूट ऑफ सोलर साठी अर्ज सरकार कडे जमा होतो.