PM Vishwakarma Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. तर आज आपण माहिती घेणार आहोत पीएम विश्वकर्मा योजनेबद्दल. ही योजना काय आहे आणि कुणासाठी आहे याचा ऑनलाइन अर्ज कसा करायचा व या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आणि पात्रता या सर्वांची माहिती आपण पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला योजनेची माहिती मिळेल व तुम्हाला कुठलीही अडचण जाणार नाही.
PM Vishwakarma Yojana 2024: योजनेचा मुख्य उद्देश
शिलाई मशीन योजना ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने अंतर्गत येथे व या योजनेचा च एक भाग आहे. या अंतर्गत सरकार नवीन शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी कारागिरांना आर्थिक सहाय्य प्रदान करते.
ही योजना भारत देशातील कारागिरांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी भारत सरकारद्वारे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना कारागिरांना कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक मदत प्रदान करण्याचे काम योजनेद्वारे करण्यात येते.( PM Vishwakarma Yojana 2024)
1)देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील हस्तकलां च्या सक्षमीकरणाला चालना देणे.
2) ग्रामीण भागातील गरीब व आर्थिक दुर्बल कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
3) कारागीर यांना काम करण्याचे साधन देणे व कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक मदत प्रदान करणे.
PM Surya Ghar Yojna 2024 : 300 यूनिटपर्यंत मोफत वीज मिळवा, असा करा या योजनेसाठी अर्ज
PM Vishwakarma Yojana नेअंतर्गत पुढील 18 पारंपरिक उद्योगांचा समावेश केलेला आहे.
1)सुतार
2)लोहार
3) होडी बनवणारे कारागीर
4) चिलखत बनवणारे कारागीर
5)हातोडी आणि अवजार बनवणारे
6)सोनार
7)कुंभार
8)कुलूप बनवणारे
9)शिल्पकार मूर्तिकार दगडी व कोरीव काम करणारे
10) चर्मकार पादत्राणे बनवणारे कारागीर
11) मिस्त्री
12)टोपल्या चटया व झाडू बनविणारे कारागीर
13)बाहुल्या आणि खेळणी बनवणारे
14) नावी केस कापणारे
15)फुलांचे हार बनवणारे कारागीर
16) धोबी
17)शिंपी
18) मासेमारीचे जाळे विणणारे कारागीर
PM Vishwakarma योजनेसाठी पात्रता
1)अर्जदार हा भारत देशाचा नागरिक असावा.
2) अर्जदाराचे वय हे 18 पेक्षा कमी आणि 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.
3) अर्जदाराच्या कुटुंबातील कुणीही व्यक्ती सरकारी सेवेत नसावे जर सरकारी सेवेत असेल तर ते कुटुंब या योजनेसाठी पात्र राहणार नाही.
4) अर्जदाराकडे संबंधित ट्रेड चे मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
1) अर्जदाराचा आधार कार्ड हे मोबाईल नंबरशी लिंक असणे गरजेचे आहे.
2) बँक पासबुक
3) पॅन कार्ड
4) वैध मोबाईल क्रमांक
5) राशन कार्ड (जर राशन कार्ड नसल्यास सर्व कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड जोडावे.)
6) उत्पन्नाचा दाखला
7) पासपोर्ट साईज फोटो
8) Cast Certificate (जात प्रमाणपत्र)
9) Adress Proof (पत्त्याचा पुरावा)
पीएम विश्वकर्मा योजनेचे फायदे ( PM Vishwakarma Yojana 2024)
1) या योजने अंतर्गत भारत सरकार कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी फी उचलेल.
2) शासनाकडून पारंपारिक कारागीर म्हणून मान्यता प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे विश्वकर्मा म्हणून मान्यता मिळेल
कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार.
3) अर्जदाराचे कौशल्य पडताळणी केल्यानंतर पाच ते सात दिवस (40 तास )मूलभूत प्रशिक्षण देण्यात येणार.
5) इच्छुक उमेदवाराला पंधरा दिवस प्रशिक्षण देण्यात येणार व दररोज पाचशे रुपये हे प्रशिक्षण विद्यावेतन म्हणून देण्यात येणार.
6) रुपये 15000 हे टूलकिटच्या प्रस्तावनासाठी अनुदान म्हणून देण्यात येईल.
7) डिजिटल व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
1)पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे PM Vishwakarma Yojana 2024 या वेबसाईट वरती ऑनलाईन अर्ज करावा.
2) सर्वप्रथम अर्जदारांनी कोणत्याही कॉमन सर्विस सेंटर वर जाऊन सर्वात आधी मोबाईल नंबर व आधार कार्ड व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे कारण यामुळे अर्जदाराची ओळख निश्चित होते.
3) मोबाईल आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र व तुमची व्यावसायिक ओळख मान्यता प्राप्त आहात की नाही हे सुनिश्चित होते
4) अर्जदाराने अर्ज केल्यानंतर अर्ज नोंदणी कुठपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.अर्जाची पडताळणी झाल्यानंतर अर्जदाराची विश्वकर्मा म्हणून नोंदणी केली जाईल व या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य आणि प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार.
5) अर्जातील सर्व माहिती व आवश्यक कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
Commenter avatars come from Gravatar.