SUMMER HEALTH TIPS : उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी हे करा ? जाणुन घ्या!
उन्हाचा पारा चांगलाच तापला आहे देशभरात उन्हाच्या झळा आणि गर्मी जाणवत आहे या गर्मीच्या काळात अनेकांना डिहायड्रेशन फूड पॉइझन घामोळ्या यासारख्या अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे गर्मीच्या या ऋतूमध्ये आपल्याला आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.(SUMMER HEALTH TIPS)
आला उन्हाळा तब्येत सांभाळा हा कानमंत्र आपल्याला आधीपासूनच दिला जातो बरोबर ना पण बऱ्याच जणांना उन्हाळ्यात आपल्या तब्येतीची काळजी कशी घ्यायची हेच माहीत नसतं आणि मग सुरू होतात प्रॉब्लेम्स जसं की उन्हाळी लागणं, चक्कर येणं ,घशाला कोरड पडणं, सतत घाम येणं इतकंच नाही तर उन्हाळ्यात आपल्याला डिहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवतात.(SUMMER HEALTH TIPS)
तर या गोष्टीपासून कसं वाचायचं? आणि उन्हाळ्यात आपल्या तब्येतीची काळजी कशी घ्यायची? याचबद्दल आपण या लेखा मधुन जाणून घेणार आहोत.
(SUMMER HEALTH TIPS) 1
तर सगळ्यात पहिलं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आपल्याला एक चेंज करावा लागणार आहे. ते म्हणजे आपल्याला गरम पाण्याने आंघोळ करायची सवय झालेली असते तर उन्हाळ्यात शक्यतो गार पाण्याने किंवा कोमट पाण्याने आंघोळ केली पाहिजे आणि त्यात एक एक्स्ट्रा बेनिफिट साठी जर तुम्ही सँंडलवूड म्हणजेच चंदनाची पावडर जर पाण्यात मिक्स केली तर बेस्ट कारण चंदनाची पावडर ही आपल्याला कूलिंग प्रॉपर्टी देते खूप छान स्मेल येतो. घामाच्या दुर्गंधीपासून आपला बचाव होतो आणि आपली स्किन सुद्धा ऑइल फ्री राहते.
WORLD’S AIDS Day 2024 : जागतिक AIDS दिनानिमित्त गैरसमज दूर करूया
(SUMMER HEALTH TIPS) 2
घराबाहेर पडताना पातळ सुती आणि मोस्टली लाईट शेड्सचे कपडे विअर करा तुमच्यासोबत स्कार्फ कॅरी करा. डोळ्यांना गॉगल लावत जा आणि शक्यतो काम असेल तरच घराबाहेर पडा.
- Chandrapur Van Patil Recruitment 2025: मध्य चांदा वन विभागा तर्फे चंद्रपूरच्या 50 गावांत वनपाटील पदांची सुवर्ण संधीChandrapur Van Patil Recruitment 2025: मध्य चांदा वन विभागा तर्फे चंद्रपूरच्या … Read more
- AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 2300+ पदांकरीता भरतीAIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 2300+ पदांकरीता भरती … Read more
(SUMMER HEALTH TIPS) 3
मुख्य म्हणजे तुम्ही तुमच्या डायट मध्ये स्वीट कोल्ड आणि लिक्विड खाणं या गोष्टी जास्त प्रेफर करा. तुम्हाला नॅचरली स्वीट असणाऱ्या गोष्टी जसं की वॉटरमेलन, मस्कमेलन, उसाचा रस, द्राक्ष किंवा ऑरेंज ज्यूस घ्यायचा आहे. ज्यात नॅचरली शुगर असते ज्यामुळे आपलं शरीर थंड राहण्यास मदत होते, सतत पाणी पीत राहा ही तर कॉमन गोष्ट आहे जे सगळेच सांगतात पण तुम्ही पाण्यात लिंबू पिळा तुळस घाला वाळा घाला किंवा चिया सीड्स तुम्ही पाण्यात घालून ते दिवसभर पाणी प्यायला तर आणखी फायदेशीर ठरू शकतं
(SUMMER HEALTH TIPS) 4
Vitamin Aआणि vitamin C रिच फूड जास्त खा. जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. आता विटामिन ए साठी तुम्ही गाजर टोमॅटो खाऊ शकता रेड ऑरेंज कलरच्या पदार्थांमध्ये विटामिन ए जास्त प्रमाणात असतं विटामिन सी युक्त फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं जे तुम्हाला उष्णतेच्या दिवसात हायड्रेट आणि थंड ठेवण्यासाठी एक उत्तम पर्याय बनतात विटामिन सी मुळे तुमची इम्युनिटी सुद्धा स्ट्रॉंग होते म्हणून तुम्ही लिंबू वर्गीय फळ खाणं आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल खाणं प्रेफर करा.
या तर बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो करा आणि उन्हाळ्यात सुद्धा फ्रेश आणि निरोगी रहा स्वतःला जास्तीत जास्त हायड्रेट ठेवा आणि फिट रहा तुम्हाला अजून कोणत्या टॉपिक वर डिटेल वमाहिती हवी आहे. हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.
SUMMER HEALTH TIPS: या गोष्टी टाळा!
- बाहेर जाताना सनग्लासेस, स्कार्प, टोपी घाला.
- उन्हातून सहसा बाहेर जाणं टाळा गरज असल्यास बाहेर पडा.
- उष्णतेमुळे येणाऱ्या थप्पक्यांबाबत नेहमी जागरूक रहा.
- उन्हाळ्यात अधिक व्यायाम करणे टाळा उष्णतेमुळे चक्कर येऊन शकते.त्यामुळे आपल्याकडे कोणता तरी एक गोडपदार्थ ठेवा.
- नारळ पाणी साधे ताक लिंबू पाणी फळांचा रस यांचा समावेश तुमच्या आहारात करा.
- उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण टिकून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त द्रव पदार्थाचे सेवन केले पाहिजे.
- उन्हाळ्यामध्ये मसाल्याचे पदार्थापासून दूर रहा.