WORLD’S AIDS Day 2024 : जागतिक AIDS दिनानिमित्त गैरसमज दूर करूया
नमस्कार मित्रांनो तर आज एक डिसेंबर जागतिक AIDS दिनानिमित्त (World’s AIDS DAY 2024 )आपण जे काही गैरसमज आहे व उपाययोजना काय करावे ? कशामुळे हा आजार होते याबद्दल सर्व माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
(WORLD’S AIDS Day 2024) AIDS म्हणजे काय ?
AIDS म्हणजे ( Aquired Immuno Deficiency Syndrome) असा अर्थ होतो. हा रोग जन्मजात नसतो. एखाद्या व्यक्तीच्या जीवन काळात झालेला असतो.
AIDS हा आजार 1981 मध्ये पहिल्यांदा नोंदवला गेला. AIDS हा आजार जन्मजात होत नसतो. या आजारामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती मध्ये कमतरता निर्माण होते.
या आजारामुळे जगभरात सर्वत्र लाखो लोक हे मृत्युमुखी पडले आहेत .योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट घेतलेले व्यक्ती हे बचावले सुद्धा आहेत.(WORLD’S AIDS Day 2024)
जगभरात हा आजार ग्रस्त एकूण 3.7 कोटी लोक आहेत. त्यापैकी 70 टक्के लोक फक्त या आफ्रिका खंडात आढळून आले आहेत.
जर कोणत्या व्यक्तीला हजर झाला असेल तर या आजाराची लक्षणे त्वरित दिसून येत नाहीत. 10-15 वर्ष ओलांडल्यानंतर या आजाराची लक्षणे जाणवण्यास सुरुवात होते वजन घटने रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे खोकला डोकेदुखी इत्यादी अशी लक्षणे दिसायला सुरुवात होत असते.
AIDS आणि HIV (Human Immuno Deficiency Syndrome) हे वेगळे आहेत. AIDS हा आजार HIV (Human Immuno Deficiency Virus) Retrovirous या व्हायरस द्वारे होत असतो. AIDS हा HIV च्या गंभीर अवस्थेत होत असतो.
2023 मध्ये जारी झालेल्या आकडेवारीनुसार जगभराचे आजारामुळे साडेसहा लाख रुग्णांचा मृत्यू झाला. या आजाराबद्दल लोकांमध्ये जागृत पसरवावी व लोकांना या आजारापासून सतर्क रहावे या उद्देशाने 1 डिसेंबरला जागतिक दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.
AIDS बद्दल काय आहे गैरसमज?
एच आय व्ही हा आजार शारीरिक संपर्काने किंवा स्पर्शाने पसरत नसतो याबद्दल अनेकांमध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे. हा आजार फक्त रक्त ,वीर्य,Body Fluids यामुळे संक्रमण होऊ शकते.
मच्छर किंवा कीटक चावल्यामुळे एचआयव्हीचा संसर्ग होत नाही. हे संशोधनातून समोर आलेला आहे. एचआयव्ही व्हायरस हा मानवी शरीराबाहेर जगू शकत नाही.
PAN CARD 2.0 : जुने पॅनकार्ड बंद होणार! जाणुन घ्या माहीती.
AIDS होण्याची कारणे कोणती?
- एच आय व्ही संक्रमित व्यक्तीसोबत दैनिक संबंध स्थापन केल्यामुळे हा आजार होऊ शकतो.
- एचआयव्ही संक्रमित रक्त एखाद्याला चढवल्यामुळे आज राहू शकतो.
- एचआयव्ही बाधित आईपासून जन्म घेतलेल्या मुलाला हा आजार होऊ शकतो.
- मल्टिपल व्यक्ति (Multiple Partners) सोबत लैंगिक संबंध स्थापन केल्यामुळे हा आजार होण्याची शक्यता असते.
- AIDS संक्रमित व्यक्तींसाठी वापरलेले इंजेक्शन हे पुन्हा दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरले तर या आजाराचा संक्रमण होण्याचा धोका असतो.
AIDS आजार होऊ नये यासाठी काय उपाय योजना करावे?(World’s AIDS Day 2024)
- मल्टिपल पार्टनर्स वेगवेगळ्या व्यक्तींसोबत लैंगिक संबंध स्थापन करणे टाळावे.(Worlds AIDS DAY 2024)
- गर्भवती महिला एचआयव्ही संक्रमित असेल तर गर्भवती महिलेला औषधी देऊन होणाऱ्या बाळाला एचआयव्ही संक्रमणापासून वाचवता येऊ शकतो
- लैंगिक संबंध प्रस्थापित करत असताना कंडोम चा वापर करावा.
- एचआयव्ही संक्रमित रक्त वापरण्यापासून दूर राहावे.
- संक्रमित रक्त किंवा इंजेक्शन पासून सावध राहावे.